भाजपच्या प्रस्तावांना शिंदेंचा नकार, नवीन मागणी घेऊन आले समोर
आज महाराष्ट्रातील राजकारणात महायुतीत एक मोठा पेच निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मंत्रिपदाच्या वाटाघाटी सुरु झाल्या. भाजपाला मुख्यमंत्रिपद हवा आहे, तर शिवसेनेनेही आपला दावा सांगितला आहे. मात्र, भाजप अजूनही मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे.
सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडीची याचिका फेटाळली, पुढे काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण शिंदेंनी या दोन्ही ऑफर नाकारल्या आहेत. शिंदे फक्त पक्षप्रमुख म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तुम्हीही गुगल मॅपवर आंधळेपणाने विश्वास ठेवत आहात का? तर सावध व्हा!
शिवसेनेने भाजपला उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन नावं प्रस्तावित करण्याचे ठरवले आहे, ज्यात मागासवर्गीय किंवा मराठा चेहऱ्याचा समावेश होऊ शकतो. याशिवाय, गृहमंत्रालयाच्या मागणीसाठी शिवसेनेने भाजपवर दबाव आणला आहे. जर मुख्यमंत्रीपद न मिळालं, तर गृहमंत्रालय मिळवण्यासाठी शिंदे गटाने कटिबद्धता दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप चार महत्त्वाची खाती – गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल स्वतःकडे ठेवणार आहे.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
या सगळ्या घटनाक्रमामुळे राज्यात राजकीय तापमान वाढले आहे, आणि महायुतीच्या अंतर्गत वाद अधिक तीव्र होत आहेत.