भाजपकडून शिंदेंची मनधरणी, त्यांच्या भूमिकेवर करडी नजर
माजी उपमहापौर राजू शिंदे ठाकरेसेनेच्या वाटेवर असल्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न माजी केंद्रीय मंत्री, माजी विधानसभा अध्यक्षांनी राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत.तरी अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.राजू शिंदे यांच्यासह भाजपचे ८ माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी ठाकरेसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांनी पक्षांतर करू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत . मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे हे दिग्गज नेते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. सावे यांनी शिंदेंची भेट घेतली.
आदित्य ठाकरेंनी डिवचलं,शिंदेंनी सुनावलं ..
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे हरिभाऊ बागडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे बागडेदेखील राजू शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर शिंदे यांची भूमिका बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे. राजू शिंदे यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवसेनेच्या संजय शिरसाट यांना आव्हान दिले होते. त्यावेळी शिंदे अपक्ष म्हणून लढले होते त्यांना ४० हजारांहून अधिक मते पडली होती.राजू शिंदे आमच्यासाठी महत्त्वाचा पदाधिकारी आहे. त्यांची कामे आम्हाला माहित आहेत, असा पदाधिकारी पक्षातून जाणे हे योग्य नाही, असे अतुल सावे आणि हरिभाऊ बागडे यांनी म्हणाले. गैरसमजातून त्यांनी काही निर्णय घेतला असेल, तर त्यांची मनधरणी चा प्रयत्न आम्ही करत आहोत.
फूड सेफ्टी अथॉरिटीमध्ये सुरुवात नोकरीची, त्वरित अर्ज करा
राजू शिंदे पक्ष सोडून जाणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिंदेसेनेला सोडण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून लोकसभेची तयारी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना धक्का बसला. असून ते नाराज आहेत. जिल्ह्यात आम्ही केवळ शिंदेसेनेचे काम करायचे का,असा त्यांचा सवाल त्यांनी उपस्थित केलाआहे. त्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरेसेनेच्या वाटेवर आहेत. ७ जुलैला उद्धव ठाकरे संभाजीनगरचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भाजपचे पदाधिकारी ठाकरेसेनेत प्रवेश करू शकतात.
Latest:
- शेतकऱ्यांसाठी CSIR ची भेट, तयार कॉम्पॅक्ट आणि किफायतशीर ट्रॅक्टर
- ब्रह्मास्त्र पिकांचे कीटक आणि सुरवंटांपासून संरक्षण करेल, सीताफळ-धतुरा पानांपासून ते घरी तयार करा
- पीक विमा न आल्यास काय करावे? तात्काळ मदतीसाठी कोणत्या नंबरवर कॉल करायचा?
- आता एकाच वेळी 4 ओळीत कांदा पेरा, हे नवीन ट्रॅक्टरवर चालणारे मशीन बाजारात आले आहे.