वडगाव बजाजनगर निवडणुकीत शिंदे गटाचा दणदणीत विजय
वाळूज महानगर वडगाव-बजाजनगर या ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरु होती. या निवडणुकीत बंडखोर आ.संजय शिरसाट यांच्या पॅनेलची विजयी घोडदौड पाहायला मिळतली. दरम्यान निकाल घोषित झाला आहे. १७ पैकी ११ जागा आ. शिरसाट गटाने जिंकल्या असून. या निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी ७२ उमेदवार आपले नशीब अजमावले होते.
नॅनो युरिया : या नवीन तंत्रज्ञानाने युरियाची फवारणी केल्यास होणार मोठी बचत
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत सहा वाॅर्डांत लढत होत आहे. गेल्या वेळी शिवसेनेने १७ पैकी १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. भाजपचे अमित चोरडिया हे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत आमदार संजय शिरसाट यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे.
फेसबुक व्हिडिओ आवडला, मोबाईलमध्ये डाउनलोड करा कोणत्याही अप्लिकेशन शिवाय
शिवसेनेत फाटाफूट झाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून, या ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. याचबरोबर मूळ शिवसेना व जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश गायकवाड यांचेही पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांनी ४ जागा मिळवल्या आहेत.
असा आहे संपूर्ण निकाल