शिंदे गट आणि भाजप सरकारचा १९ जुलै रोजी शपत विधी ?
१० दिवसाचे सत्तानाट्य आपल्या नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उप मुखयमंत्री पदाची शपत घेतली, अनेक आरोप प्रत्यारोप आपण या कालावधीत पहिले, तसेच आता सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार येत्या १९ तारखेला मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. आता या मंत्री मंडळात कोण मंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. देवेंद्र फडणवीस त्यांच्या कडे कोणते खाती ठेवतील आणि शिंदे गटाला किती मंत्रिपद मिळतील याकडे खास लक्ष सध्या राजकारण्यांचे लागून आहे.
केळीला भाव : केळीला चांगला भाव मिळत असला तरी कमी उत्पादन आणि फसवणूक यामुळे शेतकरी झाला हैराण
तसेच, शिवसेनेतून गेलेल्या मंत्र्यांना देखील या सरकारमध्ये कोणते मंत्री पद मिळेल हा प्रश्न सर्व सामन्यानं पडलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज 9 जुलै, शनिवार दुपारी 4.30 वाजता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत . यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटण्यासाठी निघाले आहेत.
यानंतर ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकांना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी काल रात्री 9.45 ते 2 या वेळेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली . या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली. आज दुपारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे या सर्व बैठकांची माहिती पत्रकारांना देणार आहे.