शिदेंकडे ४७ तर ठाकरेंकडे फक्त १४ आमदार
राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह गुजरातमधून गुहावाटीमध्ये गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेनेचे आणखी काही आमदार गुहावाटीमध्ये पोहचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहे.
साहेब, आमच्यासाठी ‘वर्षा’चे दार आजवर बंद होती! आमदार संजय शिरसाटांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
आशिष जैस्वाल, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर असे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. दीपक केसरकर, संजय राठोड, गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकात पाटील आणि मंजुळा गावित हे आमदारही शिंदे यांच्या गटात पोहचल्याची माहिती आहे. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. आता शिवसेनेकडे केवळ १४ आमदार उरल्याची माहिती असून त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.
विधानपरिषदेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते गुजरातमध्ये होते. नंतर ते गुहावाटीला दाखल झाले असून आपल्यासोबत ४० पेक्षा अधिक आमदार असल्याचे एकनाथ शिंदेंकडून दावा करण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे.