राजकारण

शर्मिला पवार यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार – “अजित पवार गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर दमदाटी आणि धमक्यांचा करताय वापर!

Share Now

शर्मिला पवार यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार “अजित पवार गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर दमदाटी आणि धमक्यांचा करताय वापर! 
बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया सुरू असतानाच शर्मिला पवार यांनी मोठा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बारामतीतील बालक मंदिर मतदान केंद्रावर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना धमकावले जात आहे. “मतदारांना घडाळ्याचे शिक्के असलेले स्लीप वाटवले जात आहेत, आणि आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे,” असा गंभीर आरोप शर्मिला पवार यांनी केला. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

टेंभुर्णी गावात मतदानावर बहिष्कार, स्मशानभूमीच्या प्रलंबित प्रश्नावर ग्रामस्थांचा निषेध

युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार – बारामतीच्या राजकारणातील चुरशीची लढाई
बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला राज्यभर महत्त्व आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात थेट मुकाबला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी मतदान प्रक्रियेत होणाऱ्या गडबडीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या चुलत्या पुतण्यांमधील राजकीय संघर्ष आता राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे.

“आज तुझा मर्डर फिक्स!” सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी, नांदगावमध्ये तणावाच वातावरण

बारामती विधानसभा – शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्षाची परतफेड
बारामती विधानसभा मतदारसंघाला लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांनी बारामतीतील आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशाने मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीमुळे आता राजकीय वातावरण अधिक चुरशीचे होईल. शरद पवार यांनी अजित पवार विरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे, ज्यामुळे बारामती मतदारसंघात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांचे सात वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून येणे, त्यांच्या पुतण्याविरुद्ध एक कठीण चुनौती ठरेल.

बारामतीमध्ये शरद पवारांचे कुटुंबीय सक्रिय – विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अजित पवार कसे जिंकतील?
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असून, बारामती मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांवर दबाव असला तरी त्यांचे विजयाचे अभिमानास्पद रेकॉर्ड आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन त्यांनी शरद पवार यांना हरवण्याचा प्रयत्न केला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल, यावर राज्यभर लक्ष लागले आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *