एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवास स्थानाबाहेर मोर्चा नेला होता, यात त्यांच्या घरावर आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पल फेकल्याने या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं होत. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले कि, आम्ही एसटी कामगाराच्या पाठीशी आहोत पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाहीत . कर्मचाऱ्यांना जर चुकीचा रस्ता कोणी दाखवत असेल तर त्याला विरोध करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे . नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर कसा दुष्परिणाम होतोय हे आज दिसल्याचं सांगत पवारांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.

आपण त्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, एव्हढंच मी सांगतो. थोडी माहिती तुम्हाला कळल्याच्या नंतर तातडीने तुमच्याभोवती अनेक सहकारी इथे पोहोचले, ते मी माझ्या पाहण्यात होते. त्यासाठी वेगळं सांगायची गरज नाही. संकट आलं की आपण सर्व एक आहोत हेच तुम्ही दाखवलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *