खा. शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय
सध्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात आले होते. राज्यपालांनी या निवडणुकीच्या बदललेल्या नियमांवर आक्षेप घेतला होता. तरीही ठाकरे सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावर ठाम असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता वेळेवर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून कायदेशीर बाबी तपासून चर्चा केली, त्यानंतर निवडणूक न घेण्याचा निर्णय झाला आहे.
राज्यपालांनी उत्तर दिल्यानं कायदेशीर पेच निर्माण झाला होता. परंतु राज्यपालांचं उत्तर आलं नसतं तर निवडणूक घेण्याची शक्यता होती.