‘ आजोबा लवकर बरे व्हा ‘ नातवांना शरद पवारांची काळजी
मुंबई : राष्ट्रवादी कँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली. काळजी करण्याचे कारण नाही मी उपचार घेत आहे असे पवार म्हणले. त्यांनी ट्विट मध्ये सांगितले, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे त्यांनी सांगितले.
आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय.
पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो!तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!#getwellsoon@PawarSpeaks
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 24, 2022
आजोबा
काळजी घ्या
तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल https://t.co/2sEEiLlYBm— Parth Pawar (@parthajitpawar) January 24, 2022
यावर भावुक होत राहीत पवार आणि पार्थ पवार यांनी भावुक ट्विटच्या माध्यमातून ‘ आजोबा लवकर बरे व्हा ‘ म्हणत काळजी व्यक्त केली आहे. रोहितचे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय. योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत ” असे ते म्हणाले. आणि पार्थ पवारांनी देखील याच प्रकारचा ट्विट केले आहे. शरद पवारांच्या कोरोना पॉसिटीव्ह असल्याची बातमी आल्याने त्यांच्या कुटुंबा सह राजकीय क्षेत्रात देखील त्यांची काळजी सर्वांना वाटत आहे.