राजकारण

शरद पवारांचा अशोक चव्हाणांवर हल्ला, भाजपच्या ‘एक है तो सेफ है’ वक्तव्यावर टीका

लातूर: महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे सभेला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला. नांदेड विमानतळावर माध्यमांशी बोलताना पवार यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभांना आजपासून सुरुवात, चार दिवस 9 सभा, एक रोड शो, संपूर्ण वेळापत्रक पाहा.

अशोक चव्हाणांवर टीका
शरद पवार म्हणाले, “चव्हाण कुटुंबाला काँग्रेसने मुख्यमंत्रिपद दिलं, गृहमंत्रिपद दिलं, अर्थमंत्री पद दिलं, सुरक्षा मंत्री पद दिलं. अशोक चव्हाणांनाही मुख्यमंत्रिपद दिलं. आणखी काय द्यायचं? लोकांना काय धडा शिकवायचा ते शिकवतील.” पवार यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये प्रवेशास “संधीसाधूपणा” असल्याचे ठणकावले आणि शंकरराव चव्हाण यांच्या काँग्रेससोबत असलेल्या विचारधारेची तुलना केली.

नांदेड पोटनिवडणुकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीबद्दल पवार म्हणाले, “या पोटनिवडणुकीची अजिबात चिंता करण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती चांगली आहे. येथील मतदार भाजपच्या विचारसरणीला पाठींबा देणार नाहीत.”

एक है तो सेफ है’ आणि भाजपच्या प्रचारावर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक है तो सेफ है” या वक्तव्यावर शरद पवारांनी टीका केली. “भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची जातीयवादी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे,” असं पवार म्हणाले. ते म्हणाले, “निवडणूका येतात आणि जात जात, धर्म धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करू नये. पण भाजप आणि त्यांचे मित्र यांना याचं भान नाही.”

योगी आदित्यनाथंच्या उपस्थितीवर टीका
शरद पवार यांनी भाजपच्या जातीयवादावर लक्ष केंद्रित करत, योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रात आणण्याच्या प्रयत्नाला विरोध केला. “जातीयवादाकडे निवडणूक न्यावी, यासाठीच योगी आदित्यनाथ यांना आणलं जातं,” असं पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी भाजपच्या प्रचाराच्या रणनीतीवर तीव्र शब्दांत टीका केली आणि महाविकास आघाडीच्या विजयावर विश्वास व्यक्त केला.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *