औरंगाबाद शहरातील डॉक्टरचं लज्जास्पद कृत्य, परिचारिकेवर वारंवार अत्याचारनंतर गर्भपात
औरंगाबाद शहरातील डॉक्टरच लज्जास्पद कृत्य हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या परिचारिकेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच या डॉक्टरच्या तीन मित्रांनी पीडितेचा विनयभंग केला, या आरोपीच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीमध्ये डाक्टर प्रसाद संजय देशमुख, मित्र दीपक पाटील आणि सचिन शिंदे यांच्यासह आणखी एकाच समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या डॉक्टरने पीडितेवर वारंवार अत्याचार करून ती गरोदर राहिली होती, डॉक्टरने तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात देखील केला आहे.
अश्या परिस्थितीमुळे ती डॉक्टरकडे पुन्हा गेली होती. डॉक्टरने मुकुंदवाडी भागातील नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये नेऊन त्या परिस्थितीत बलात्कार केला. आरोपी दीपक पाटीलने पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या तावडीतून सुटून सिडको बसस्थानकात आली. त्यानंतर दामिनी पथकाने पीडितेला मदत करून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून भाजप नेत्या चित्र वाघ यांनी या नराधमांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1480940970292101121?t=ZELvd2cOHyhv_qjMc7ki7Q&s=19