शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सांगतेय अनेक विद्यार्थी रेंज मध्येच नाहीत
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येते. परंतु यंदा कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या. पण ऑनलाईन शिक्षण सुरु होतं. असं असलं तरीही हे ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यत पोहोचलेच असेल असं नाही. एप्रिल-मे या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण होत असते. परंतु कोरोनामुळे हे सर्वेक्षण झालेले नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण यंदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद जिल्हयात फक्त ३४ शाळाबाह्य विद्यार्थी तर १४ विद्यार्थी कधीही शाळेत गेले नसल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. औरंगाबादमध्ये ५, कन्नड मध्ये २८ आणि फुलंब्री मध्ये १ हे विद्यार्थी शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले आहेत. यामधील ८ विद्यार्थी हे दिव्यांग आहे.
औरंगाबाद मधील काही कुटुंब ऊसतोडणी साठी गेलेले असल्यामुळे ३४ विध्यार्थी शाळाबाह्य कसकाय असा प्रश्न या अधिकाऱ्यांनी विचारला आहे. जिल्हयातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोडणीच्या वेळी स्थलांतर होते. ज्या तालुक्यातून स्थलांतर होते तिथे पुन्हा सर्वेक्षण करुन क्रॉसचेक करा नाहीतर खोटे अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा असं शाळाबाह्य मुलांचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणाले आहे.
त्याचबरोबर जिल्हयात फक्त ३४ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दीड-दोन वर्षापासून शाळा बंद आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग एक दीड महिन्यापूर्वी सुरु करण्यात आले असून प्राथमिक वर्ग अजून सुरु झालेले नाहीत. मग फक्त ३४ विद्यार्थी कस काय सापडले. शहरातील सर्वेक्षणात काय आढळले असे मनपा शिक्षण विभागात विचारले असता कोरोनामुळे सर्वेक्षण झाले नव्हते ते आता सुरू करण्यात आले आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितल असल्याचं उघड झाले.
कोरोना काळात बऱ्याच घरात किंवा मुलांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेणं काही जणांसाठी अवघड जातं. खेड्या गावात रेंज प्रॉब्लम आणि मोबाईल घेण्यासाठी घरची परिस्थिती योग्य नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन लेक्चर करता येत नाही. त्याचबरोबर कोरोना काळात मुलींचं शिक्षण तर पूर्णपणे बंद करून त्यांचे बालविवाह लावून दिल्याचे प्रकारही उघड झाले आहे.