news

लातूर उदगीर मार्गावरील अपघातात सात वाहनं जळून खाक; टँकर चालकाचा मृत्यू, पाच जखमी

Share Now

Latur Accident Update : लातूर उदगीर मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातात सात वाहन जळून खाक झाली आहेत.

उदगीर (Udgir) मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. भातखेडा इथल्या मांजरा नदीच्या पुलाच्या पुढे आज पहाटे अपघात झाला. डिझेल टँकरला (Diesel Tanker) ऊसाच्या ट्रॅक्टरने ( Sugarcane Tractor) जोरदार धडक दिली. यामुळे डिझेल टँकरला आग लागली. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रुप धारण केलं आणि यात सात वाहन जळून खाक झाली आहेत. यामध्ये डिझेलच्या टँकर चालकाचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत.

ति ‘सॉरी’ म्हणाली असती तर ..! औरंगाबाद जळीतकांड प्रकरण तपासात महत्वाची माहिती समोर

कसा झाला अपघात?
ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि डिझेलचा टँकर यांच्यात धडक झाली. टँकरमधून डिझेल रस्त्यावर वाहत होते. अरुंद रस्त्यावर वाहनं अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यात बाजूला जाणारी एक कार बंद पडली. कार चालकाने कार रेस करण्यास सुरुवात केली. बसमधील काही प्रवासी खाली उतरले होते. त्यांनी कार चालकास गाडी रेस करु नको, आग लागू शकते असंही सांगितले होते. मात्र त्याच दरम्यान कार रेस करणं सुरुच होतं. यातच सगळ्यात आधी कारने पेट घेतला. बसमधील जो प्रवासी आग लागू शकते असं सागण्यासाठी गेला होता तोही यात भाजला आहे. रस्त्यावरील डिझेलमुळे काही क्षणात आग सर्वत्र पसरली. टँकर चालक गफार इस्माईल शेख याला वाहनातून उतरण्याची संधी मिळाली नाही. डिझेल टँकर, कापसाचा ट्रक, दोन कार, एसटी महामंडळाची बस, ऊसाचा ट्रॅक्टर अशी सात वाहनं जागीच भस्मसात झाली.

Child Invest : मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी असे कराल आर्थिक नियोजन, मग कधीच अडचण येणार नाही

युद्ध पातळीवर मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील पाच पोलीस पथकं घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन लातूर उदगीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. लातूर शहरातून उदगीरकडे जाणाऱ्या वाहनाचा मार्ग बदलण्यात आला. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बाजूलाच असलेल्या मांजरा नदीपात्रातून पाण्याची सोय करण्यात आल्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यात यश आलं. डिझेल टँकरला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानाची चांगलीच दमछाक झाली होती. त्यातच कापसाच्या गाठी वाहतूक करणारा ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आगीवर नियंत्रण करताना वेळ लागला. एसटी महामंडळची बस आणि दोन कार जागेवर जळून खाक झाल्या.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्यानंतर आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का ? नवीन दर जाणून घ्या

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, पाच रुग्णवाहिका आणि मोठ्या प्रमाणात हजर असलेल्या पोलिसांनी पुढील हानी टाळण्यासाठी प्रयत्न केले.

आयुष्यातील पहिलं घर खरेदी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा, कोणतीही अडचण येणार नाही

महामार्गाच्या कामामुळे वाहतुकीला अडसर
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 च्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे वळण रस्त्यावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याच अरुंद रस्त्यावर हा अपघात झाला. यामुळे कमी जागेत जवळ आलेली वाहनं एका पाठोपाठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सकाळपासून दुसरा वळण रस्ता तयार करण्यात आला असून लातूर-नांदेड रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

विक्रम गोखले जिवंत: अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूची बातमी खोटी

गव्हाच्या दरातील चढउतारावर सरकारची नजर, असामान्य वाढीवर पावले उचलणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *