जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन

जेष्ठ अभिनेते रमेश देव याच निधन झाल आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यानी अखेरचा श्वास घेतला त्यांच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अशी माहिती रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली आहे. ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता.

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत जेष्ठ अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत १८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केले होते. १९५१ मध्ये केले अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *