देशराजकारण

काँग्रेसच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांनी दिला मुर्मूनां पाठिंबा का घडले असे पहा

Share Now

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) राष्ट्रपतीपदासाठी एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. झारखंडमध्ये झामुमो आणि काँग्रेसचे युतीचे सरकार असून पाठींबा जाहीर केल्यांनतर काँग्रेसला धक्का बसला आहे.

आता राज्याच्या सीमेबाहेरही शेतकरी आपला शेतीमाल सहज विकू शकणार, (POP) लाँच

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याचा मान मिळणार असल्याचे सांगत झामुमोने पाठींबा जाहीर केला आहे. पक्षाचे अध्यक्ष दिशोम गुरू शिबू सोरेननी सर्व खासदार आणि आमदारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूजींच्या बाजूने मतदान करण्याचे निर्देश दिले आहेत. झामुमोच्या घोषणेनंतर काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चासोबतच्या संबंधांवर चर्चा करण्यासाठी आज, १५ जुलैला रांचीमध्ये बैठक बोलावली आहे. यामध्ये राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

बॉलीवूड गायक दलेर मेहंदीला मानवी तस्करी प्रकरणात अटक, 2 वर्षांची शिक्षा

झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेसला धक्का देण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी राज्यसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने एकतर्फी निर्णय घेत आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले होते. तर काँग्रेसने त्या जागेवर आपला दावा सांगत होती परंतु, त्यांनतर सुद्धा त्यांची युती राहिली. झामुमोच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेसने तात्काळ बैठक बोलावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *