मनोरंजनमहाराष्ट्र

पहा हा खास पोवाडा, संभाजीराजे छत्रपती यांनी देखील केले या पोवाड्याचे कौतुक

Share Now

औरंगाबाद :- The Magic Touch Productions प्रस्तुत मुजरा मानाचा शाहिरांचा छत्रपती शिवबा चरणा..! हा पोवाडा ६ जून सोमवार रोजी राज्याभिषेक दिनी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. शाहिरी बाणा आणि लोककला टिकवण्यासाठी हा एक मोठा प्रयत्न द मॅजिक टच (The Magic Touch Productions) ने उचलले आहे. तसेच हा पोवाडा प्रेक्षकांच्या पसंतीचा ठरत आहे. चित्रीकरण आणि संगीतला प्रेक्षकांची खास पसंती मिळत आहे. काही वेळातच हजारो प्रक्षकांनी हा पोवाडा पहिला.

हेही वाचा

संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या पोवाड्याचे कौतुक केले असून TMT musics साठी शुभेच्छा देखील दिल्या. या पोवाड्याचे दिग्दर्शन the magic touch productions संचालक सचिन अनर्थे यांनी केले असून रचनांकर शाहीर कुंतीनाथ कर्के यांनी केले आहे. गायन शाहीर अजिंक्य लिंगायत यांनी केले आहे तर यासाठी मार्गदर्शन जेष्ठ शाहीर अंबादास तावरे यांनी केलं आहे. तसेच हा पोवाडा तुच्यासाठी खास TMT musics च्या युट्युब चॅनलवर प्रदर्शित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *