दिल्ली पोलिसांकडून नुपूर शर्मा यांना सुरक्षा
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा यांना सुरक्षा पुरवली आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नुपूर शर्मा यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
हेही वाचा : सरकारी नोकरी 2022: रेल्वेमध्ये 10वी पाससाठी 1000 हून अधिक पदांसाठी भरती, परीक्षेशिवाय थेट भरती
नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्यानंतर त्यांनी या संदर्भात दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवली आहे.
हेही वाचा : औरंगाबादेत हत्येचे सत्र सुरूच, बहिणीला त्रास देणाऱ्या भावोजीला मेहुण्याने संपवले
नुपूर शर्माने एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबरांवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्याचे पडसादही उमटले होते. या प्रकरणानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. रविवार, ५ जून रोजी यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म विकसित झाला आहे. भाजपा सर्व धर्मांचा सन्मान करते. भाजपा कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक व्यक्तींच्या अपमानाचा निषेध करते. असा अपमान करणाऱ्या विचारधारेच्या विरोधात भाजपा आहे. अशा विचारधारेचा प्रचार भाजपा करत नाही.