सर्वसामान्याच्या खिशाला कात्री ; गॅस, पेट्रोल आणि डिझेलची भाव वाढ
पेट्रोल, डिझेल आणि आता घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
मागील वर्षी ६ ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्यांचे किचन बजेट बिघडणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत होत असलेले चढ-उतार, भाज्या, धान्याच्या दरवाढीने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता गॅस आणि इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे.
आजपासून देशात पेट्रोल-डिझेल महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर ८४ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८३ पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते.
14.2 किलोग्राम घरेलू रसोई गैस एलपीजी की कीमत में प्रति सिलेंडर 50 रुपये की बढ़ोतरी की गई। आज से कीमत 949.50 रुपये होगी: सूत्र pic.twitter.com/grbcX8p5q8
— ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2022