राज्यात शाळा उघडणार मात्र औरंगाबादेत बंद, आयुक्तांचा निर्णय
औरंगाबाद : वाढत्या कोरोनामुळे शालेय विध्यार्थी आणि शिक्षकांचा विचार करून शाळा व महाविद्यालय १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला होता. मात्र आता कोरोनाचा आकडा कमी होत असल्याने राज्यात पालक आणि विध्यार्थी यांनी शाळा सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर शाळा पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी या प्रस्तावाला हिरवे कंदील दाखवले.
जरी राज्यात शाळा उघडत असेल तरी औरंगाबाद जिल्यात शाळा बंदच राहतील असा निर्णय मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी घेतला आहे. जिल्यात ३५ टक्के पॉसिटीव्हिटी रेट आहे. यामुळे विध्यार्थी व शिक्षक यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला गेलेला आहे. पुढील आठ दिवस निरीक्षण करून शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे आयुक्त म्हणले.
दरम्यान, गेल्या 19 दिवसात 1 ते 10 वर्ष वयोगटातल्या 17, 533 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शाळा उघडायचा निर्णय़ झाला असला, तरी शाळेत मुलांना पाठवायचं का याबाबत पालकांच्या मनात भीती आहे.