औरंगाबादेतील शाळा उद्यापासून सुरु; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
औरंगाबाद : विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता उद्या मंगळवार दि.25 जानेवारीपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग व शहरातील आठवी पासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेला प्राधान्य देऊन कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करुन शाळा सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.
दरम्यान, शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्याने घेतला होता तरी औरंगाबाद जिल्यात शाळा बंदच होत्या. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी अस्या सूचना केल्या होत्या. जिल्यात ३५ टक्के पॉसिटीव्हिटी रेट आहे. यामुळे विध्यार्थी व शिक्षक यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला गेला होता असे त्यांनी सांगितले होते. मात्र आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साप्ताहिक कोविड आढावा बैठकीत मंगळवार दि.25 जानेवारीपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग व शहरातील आठवी पासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.