संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची एक दिवस आधीच सांगता.
या अधिवेशनात मुख्य बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या अधिवेशनात लोकसभेच्या कामकाजात अपेक्षित हजरी लावली नाही, मात्र त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्याचे दौरे काही थांबवले नाही. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी टीका देखील केली.
संसदेत हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबर रोजी सुरू झालं, अधिवेशन २३ डिसेंबर पर्यंत चालणार होत परंतु कामकाजात येणाऱ्या व्यत्ययामुळे यंदाच्या अधिवेशनाची सांगता एक दिवस आधीच करण्यात आली.
पुढील हिवाळी अधिवेशन बहुचर्चित असलेल्या संसदेच्या नव्या इमारतीत होईल असा विश्वास लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी व्यक्त केला.
या अधिवेशनात लोकसभेमध्ये कामकाजाची उत्पादकता ८२ टक्के राहिल्याचे लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि संसदीय कार्यमंत्रालयाकडून सांगितले.
या वर्षी चाललेलं अधिवेशन या मुद्द्यावर गाजलं आहे.
विरोधी पक्षातील राज्यसभेच्या १२ खासदारांच निलंबन , या निलंबन झालेल्या खासदारांनी संसदेच्या समोर असलेल्या गांधी पुतळ्या समोर आंदोलन केले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेण्यात यावा, कारण लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलकांवर त्यांचा मुलगा आशिष मिश्रा त्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.
कृषी कायद्यावरून केंद्र सरकारची माघार, केवळ घोषणेवर विश्वास न ठेवता शेतकरी त्याच्या मागण्या अधिकृतपणे मान्य करून घरी परतले.
बोगस मतदान टाळण्यासाठी मतदान कार्ड ला आधार जोडण्यात यावं, यावरून देखील बराच गदारोळ संसदेत बघायला मिळाला.
सीबीआय आणि ईडीच्या संचालकांचा कार्यकाळ वाढवणे तसेच दिल्ली विशेष पोलीस स्थापना स्थापना विधेयक बहुचर्चित निवडणूक सुधारणा विधेयक, बालविवाह प्रतिबंधक कायदा दुरुस्ती विधेयकासह १२ विधेयके मंजूर करण्यात आली.