संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कुन्नुरजवळ क्रॅश !

संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर ला कुन्नूर (तामिळनाडू) मध्ये अपघात झाला. कुनुर भागात हेलिकॉप्टर क्रॅश झाले. एमआय- १७व्ही ५ या हेलिकॉप्टर मधून रावत प्रवास करत होते. १४ जण या हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते. यातील दोघांचा मृत्यू झाला असून तीन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार बिपीन रावत यांच्या बरोबर त्यांची पत्नी मधुलिका रावत देखील सोबत होत्या. हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांची पत्नी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. पूर्ण माहिती हाती आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *