संजय राऊतांना तीन दिवसांची ईडी कोठडी, ईडीची आठ दिवसांची मागणी फेटाळली, काही अटी देखील ठेवण्यात आल्या
महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी (३१ जुलै) रात्री उशिरा अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतील चाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊतला अटक केली आहे. ईडी त्याला विशेष पीएमएलए कोर्टात हजर करेल आणि काही वेळात रिमांडची मागणी करेल. ईडीने ८ दिवसांची कोठडीची मागणी केली होती.
सलमान खानला मिळाले बंदुकेचें लायसन्स, जाणून घ्या का केली होती सलमानने मागणी
जोरदार युक्तिवाद यावेळी झाला. २०१० पासून हे प्रारण कस आणि कश्या प्रकारे पैश्याचा व्यवहार झाला याच्यावर यक्तीवाद झाला. सकाळी ८.३० ते ९.३०या वेळात राऊतांना त्यांच्या वकीलांशी चर्चा करण्यास वेळ मिळणार आहे. तसेच १० ते रात्री १० १२ तास संजय राऊतांची चौकशी केली जाईल यावेळी त्यांचे वकील काही अंतरावर बसलेले असतील. असे देखील कोर्टाने परवानगी देण्यात अली. ईडी कडून हितें वेंगावकर तर राऊतांकडून अशोक मुंदर्गी यांचा युक्तिवाद झाला.
पशु आरोग्य काळजी: जनावर आजारी आहे की नाही? या सोप्या मार्गाने पहा
यावर न्ययालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्ट पर्यंत एडी कोठडी देण्यात अली आहे. एडी कडून ८ दिवसाची मागणी केली होती मात्र ३ दिवसांपर्यंत न्यायालयाने राऊतांना ईडी कोठडी देण्यात अली. न्यायाधीश देशपांडे यांनी आदेश देताना आठ दिवस कोठडीची गरज नाही असे म्हणत ती दिवसांची ईडी कोठडी राऊतांना देण्यात अली आहे.