संजय राऊत यांची राज ठाकरे आणि मोदींवर टीका; ‘भाषा हे हत्यार आहे, आमचं राजकारण परंपरेतून
संजय राऊत यांची राज ठाकरे आणि मोदींवर टीका; “भाषा हे एक हत्यार आहे, आम्ही परंपरेचे राजकारण करत आहोत”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्रात “भाषा घाणेरडी केली” अशी टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं. “राज ठाकरे बोलतायत, बोलू द्या. भाजपाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो? आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं आहे की, जी भाषा समजते, ती भाषा वापरा,” असं राऊत म्हणाले.
भारतीय रेल्वेमध्ये 5647 पदांसाठी निघाली जागा, परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी
भाषेचा वापर महाराष्ट्राच्या शत्रूसाठी करावा
राऊत म्हणाले, “जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, लूट करतायत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा एक हत्यार आहे. आम्ही चाटूगिरी करणारे लोक नाहीत. राज ठाकरेंना काय बोलायचं ते बोलू द्या, त्यांचं त्यांना माहीत.” तसेच, “भाजप आणि फडणवीस यांच्या स्क्रिप्टप्रमाणेच काही लोक बोलतात, त्यांना मी काय बोलू?” असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांनी शिकवलं की, भाषेची शुद्धता नाही, पण योग्य वेळी योग्य भाषा वापरा
संजय राऊत यांनी स्पष्ट केले, “आम्ही अत्यंत सभ्य, सुसंस्कृत माणसं आहोत. बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे. त्यांना आम्ही काही शिकवायला जात नाही,” असं सांगत त्यांनी आपल्या राजकीय परंपरेवर अभिमान व्यक्त केला.
मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
मोदी-शाह यांच्या काळात कोणीही सुरक्षित नाही
पंतप्रधान मोदींच्या “एक हैं तो सेफ हैं” या विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “मोदींनी पंतप्रधान म्हणून बोलावं, पण त्यांच्या काळात कोणीही सुरक्षित नाही. आम्ही अनसेफ होतो त्यांच्यामुळेच. आमच्या शिवसेना कुटुंबाला त्यांनीच फोडलं.”
Latest:
- 750 रुपयांच्या डोसने गाय, म्हैस, वासरू देतील जन्माला ! हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी आहे वरदान, वाचा सविस्तर
- तेलबिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे, २१ राज्यांतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची तयारी
- ‘भारत’ ब्रँडचा तांदूळ, पीठ आणि डाळींची विक्री पुन्हा सुरू, यावेळी एवढी असेल किंमत
- ICAR ने रब्बीमध्ये HD3388 गव्हाच्या नवीन जातीची पेरणी करण्याचा सल्ला दिला, शेतकऱ्यांना 125 दिवसांत 52 क्विंटल उत्पादन मिळेल.