संजय राऊत म्हणाले जर मुंबईत याला तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, आमदारांनी गुवाहाटीशी संवाद साधू नये, त्यांनी मुंबईत परत यावे आणि मुख्यमंत्री उद्धव यांच्याशी या विषयावर चर्चा करावी. सर्व आमदारांची इच्छा असल्यास आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करण्यास तयार आहोत, मात्र त्यासाठी त्यांना येथे येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागेल.
शिदेंकडे ४७ तर ठाकरेंकडे फक्त १४ आमदार
शिवसेना नेते संजय राऊत यांनी एमव्हीएमधून बाहेर पडण्याचा विचार करणार असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसने आज दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर आपल्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राऊत म्हणाले की, पक्षाच्या सर्व आमदारांची इच्छा असेल तर ते महाविकास आघाडी तुन बाहेर जाण्याचा विचार करू शकतात. या बैठकीला एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना बळजबरीने सुरतला नेल्याचा आरोप झाल्यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे कॅम्पने त्यांचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये ते सुरतला जाण्यापूर्वी इतर बंडखोर आमदारांसोबत दिसत आहेत. शिवसेना आमदार नितीन देशमुख म्हणाले होते की, आम्हाला जबरदस्तीने सुरतला नेण्यात आले, मी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण सुरत पोलिसांनी पकडले. कोणतीही गुंतागुंत नसतानाही डॉक्टरांनी मला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. 300-350 पोलीस आमच्यावर लक्ष ठेवून होते