संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्ला: ‘भ्रष्टाचार, देशद्रोह आणि धार्मिक ध्रुवीकरणाची भूमिका
संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप: भ्रष्टाचार, देशद्रोह आणि महाराष्ट्रद्रोहाची टीका
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांनी म्हटलं की, “इतर पक्षांतील सर्व भ्रष्टाचारी, मनी लॉंडरिंगचे आरोपी आणि ईडी, सीबीआयचे भूतपूर्व आरोपी भाजपात सामील झाले आहेत.” ते म्हणाले की, “इक्बाल मिर्ची आणि दाऊद इब्राहिमशी आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना मोदींनी आपल्या पक्षात घेतले.” राऊत यांनी मोदी सरकारवर संविधान, कायदा आणि न्यायालये आपल्या स्वार्थासाठी मोडून ठेवण्याचा आरोप करत, देशाच्या सार्वजनिक संपत्तीकडे एक उद्योगपतीच्या हातात सूपुर्द करण्याची टीका केली.
राज ठाकरे यांचं स्फोटक विधान, ‘उद्धवसोबत एकत्र येऊ नयेत यासाठी अनेक लोक प्रयत्नशील
निवडणूक प्रचारात मोदींच्या भाषणांवर राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “पंतप्रधान मोदी हे आपल्या पदाची प्रतिष्ठा खालच्या पातळीवर आणत आहेत. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ अशी गर्जना करणं हे शोभून दिसत नाही,” असे ते म्हणाले. तसेच, मोदींनी धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू केल्याचा आरोप करत, “महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांत 370 कलमाचा मुद्दा उचलून लावणे ही केवळ बनवाबनवी आहे,” असं ते म्हणाले. राऊत यांनी मोदींच्या भाषणातील वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करत, “काँग्रेसच्या विरोधावरून 370 कलमाचा मुद्दा आणणे हे केवळ निवडणुकीसाठी असलेलं फेकुगिरी आहे,” असा दावा केला.
मेरे देश में रहनेवाले “…सिर्फ नेताओं को गाली देते है”
राऊत यांनी मोदींवर आणखी एक गंभीर आरोप केला आणि महाराष्ट्रातील रोजगाराच्या समस्येबद्दलही बोलले. “महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातमध्ये हलवले गेले, ज्यामुळे मराठी तरुण बेरोजगार झाले,” असं ते म्हणाले. त्यांच्या या आरोपांवर राऊत यांनी पंतप्रधान मोदींना रोजगार, उद्योग आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यांवर उत्तर देण्याचे आव्हान केले. “विकासाचे मुद्दे कमी पडलेत, म्हणूनच मोदी हे भलतेच मुद्दे उपस्थित करत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.