Uncategorized

जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये संजय राऊत व मित्रपरिवाराने केला १०० कोटींचा घोटाळा – किरीट सोमय्या

Share Now

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत त्यांच्या मित्रावर पुन्हा एकदा एक गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय तसेच भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवलं. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचं कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवलं असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.

“संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, पेपर कंपनी. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले.

या ठिकाणी अनेक करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केलं, २० कोटींचं दुसरे करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.” असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

“आज दुपारी ४ वाजता मी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. खोटे डॉक्युमेंट्स देवून कॉन्ट्रॅक्ट मिळविला. कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, गुन्हा दाखल झाला पाहिजे.” अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *