राजकारण

कन्नडमध्ये संजना जाधव यांचे भावनिक भाषण; नवऱ्याच्या त्रासाचा केला खुलासा

कन्नड विधानसभा मतदारसंघात नवरा-बायकोची चुरस; संजना जाधव यांच्या भाषणात अश्रू अनावर
कन्नड विधानसभा मतदारसंघात सध्या एक अनोखी लढत पाहायला मिळत आहे, जिथे नवरा-बायकोच सामोरा- समोर आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव आणि भाजपचे हर्षवर्धन जाधव यांच्यात निवडणुकीच्या रिंगणात मोठी चुरस आहे.

गोविंदा यांची तब्येत खराब, पाचोऱ्यातून प्रचार थांबवून मुंबईकडे रवाना

संजना जाधव यांनी आपल्या भाषणात नवरा हर्षवर्धन जाधव यांच्याकडून किती त्रास सहन करावा लागला हे मोकळेपणाने सांगितलं. त्यांनी सांगितले की, लग्नानंतर त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. हे सांगताना संजनांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या काही वेळासाठी थांबल्या. त्यानंतर त्यांनी भाषण पुन्हा सुरू करतांना सांगितलं की, त्यांच्या वडिलांनी (भाजप नेते रावसाहेब दानवे) नेहमीच त्यांना धैर्य दिलं,

‘माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप झाले. पण आम्ही शांत राहिलो,कारण एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असतात म्हणून आम्ही सहन केले. एका मुलाचा बाप असता तर तो रस्त्यावर उत्तरला असता, पण एका मुलीचा बाप आहे म्हणून ते शांत बसले. हे सांगताना संजना जाधव यांना अश्रू अनावर झाले.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *