संप संपता संपेना एसटी अजून रुतलेली !
एसटी कामगारांचा संप एक महिना झाला सुरूच आहे, परंतु संप काही संपत नाही. चौकस दृष्टीने विचार केला तर आता तरी संप मागे घ्यायला हवा नेमकं अडतंय कुठे..? युनियन्सची वाढलेली संख्या आणि यामध्ये शिरलेले राजकारण यामुळे संप आता चिघळू पाहतोय. शासनाने कठोर भूमिका घेतल्याने हळू हळू संपकऱ्यांचा संयम सुटतोय तर दुसरीकडे जीवनवाहिनी एसटी बंदच असल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला आहे. आज तब्ब्ल महिना झालाय संप सुरु आहे. एसटीच्या इतिहासातील हा सर्वात लांबलेला संप म्हणता येईल.
ग्रामीण भागातील जनतेला प्रवासासाठी हा एकमेव पर्याय आहे. याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. कामगारांच्या बऱ्याच मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. एसटी कामगाराच्या बहुतांशन मागण्या पूर्ण झाल्या आहेत, मात्र महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासनात सहभागी करून घेण्याची अट मेनी होईल ही परिस्थितीच नाही. सामान्य जनतेला जो त्रास सहन करावा लागत आहे यावर सरकारने आणि कामगार संघटनांनी देखील विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.
एसटी कामगारांच पहिल्यांदा प्रदीर्घकाळ चालेल आंदोलन आहे. आधीच एसटी तोट्यात त्यात संपामुळे ४५० कोटी एवढं नुकसान या संपादरम्यान झाल्याची माहिती आहे. ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्टातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. २४ रोजी राज्य शासनाने कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनात वाढ करून माध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र आजही संप काही संपलेला नाही. दरम्यान भाजपाने या संपातील संघटनांना बळ देण्याचा प्रयत्न केला पण पुढे लढाईत त्यांना अर्ध्यावर सोडून माघार घेतली. यामुळे तर संघटनांची एक वेगळीच कोंडी दिसून येत आहे. अशा सर्व पार्शवभूमीवर आता नक्की काय होणार या संभ्रमात महाराष्ट्र आहे.
संप आणखी काही दिवस कायम चालू राहिला तर शासन भविष्यात एसटीच खासगीकरण करणार का .? कारण विलीनीकरण या एकाच प्रश्नावर कर्मचारी मागे हटत नाहीये.