Uncategorized

वैजापूरात मराठवाडा ‘मुक्ती संग्राम’ (हैदराबाद मुक्ती दिन) लढयातील ‘हुतात्म्यांना अभिवादन’

Share Now

वैजापूर ता,१७  येथील मराठवाडा मुक्ती संग्राम लढयातील हुतात्मा जगन्नाथ भालेराव यांच्या स्मरणार्थ असलेल्या हुतात्मा
स्मारकातील स्मृती स्तंभ ला कै,स्वातंत्र्य सैनिक गणपतराव लोंढे यांच्या पत्नी श्रीमती कमलाबाई गणपतराव लोंढे यांच्या हस्ते शनिवार(ता,१७)रोजी
ध्वजवंदन करून अभिवादन करण्यात आले, मुख्य शासकीय ध्वजवंदन उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी माणिक आहेर यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता संपन्न झाले,

नगर परिषदेत नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, तर तहसील कार्यालयात तहसीलदार राहुल गायकवाड,प,स,कार्यालयात प्र,गट विकास अधिकारी एच,आर, बोयनार तर विविध कार्यालयात कार्यालय प्रमुखांनी ध्वज वंदन केले,या कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार स्वच्छतादूत तथा सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांनी करून मराठवाडा मुक्ती संग्राम लढयाची माहिती दिली,

कोण बनेगा करोडपातीला ‘कोल्हापूरमधून’ भेटली या सीजनची पहिली करोडपती!

या प्रसंगी उपनगराध्यक्ष साबेरखान,डॉ,दिनेश परदेशी,नगरसेवक गणेश खैरे,सखाहरी बर्डे,स्वप्नील जेजुरकर,डॉ,प्रीती भोपळे,दिनेश राजपूत,राजेश गायकवाड, मुख्याधिकारी भागवत बिघोत, नायब तहसीलदार रामेश्वर महाजन,महेंद्र गिरगे,डॉ,व्ही,जी, शिंदे,अशोक पवार,समीर लोंढे,मोती हिवाळे,प्रमोद निकाळे,रमेश त्रिंभुवन,श्री,चिमटे,महादेव चांदगुडे, विष्णू आलूले,स,गटविकास अधिकारी अमेय पवार,महेश शिंदे पाटील, दीपक त्रिभुवन,श्री कहाटे, यांच्या सह शहरातील समाज कार्यकर्ते ,न,प,कर्मचारी यांची उपस्थिती होती,

या निमीत्ताने नगर पालिकेच्या वतीने हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात यंग इंडिया अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सेंट मोनिका इंग्लिश शाळेचे छात्र यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन स्वछता केली,तसेच नारंगी धरणावर जाऊन त्याही ठिकाणी स्वछता करून स्वच्छता संदेश आजच्या या मुक्ती संग्राम दिनी देण्यात आला-

लिंबू शेती: शेतकऱ्यांनी लिंबू झाडांना पानं खाणाऱ्या किडीपासून वाचवा, अन्यथा होईल मोठं नुकसान

(फोटो कॅप्शन-हुतात्मा स्मारकात कमलबाई लोंढे ध्वज फडकविताना तर स्वच्छता साठी आरंभ करताना तहसीलदार गायकवाड, नगराध्यक्ष श्रीमती परदेशी,साबेरखान,दिनेश परदेशी,भागवत  बिघोत व अन्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *