सलमान खानला मिळाले बंदुकेचें लायसन्स, जाणून घ्या का केली होती सलमानने मागणी
मुंबई पोलिसांनी सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, अलीकडील धमकीच्या पत्रांच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवान्याचा अर्ज केल्यानंतर त्याला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सलमान खान आता बुलेट प्रूफ कारमधून फिरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय सलमानच्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी सलमानला बंदुकीचा परवाना जारी केला आहे. 22 जुलै रोजी सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची दक्षिण मुंबईतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता.
सुर्वण पदक मिळवल्या नंतर अचिंत श्यूलीची प्रतिक्रिया, म्हणाला…
मात्र, सलमान खानने पत्रकारांना सांगितले की, पोलीस आयुक्त हे त्यांचे जुने मित्र आहेत आणि ते त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेले होते. जून महिन्यात खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते अशा वेळी ही बैठक झाली. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पंजाबी गायक सिद्धू मूसवालाप्रमाणेच मारले जाईल, अशी धमकी देणारे पत्र आले होते. मे महिन्यात मुसेवाला यांची सार्वजनिकरित्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हे पत्र मिळाल्यानंतर खान यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
कॅनेडियन गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टमध्ये गायक मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. गोल्डी ब्रार हा पंजाबी रॅपरच्या हत्येतील प्रमुख संशयित गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे.