रशियाची मोठी घोषणा ; युक्रेनच्या चार शहरात हल्ले थांबवले
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबलेलं नाही. रशिया मागील १२ दिवस झाले युक्रेनवर हल्ला होतोय. रशियाकडून सुरू असलेले बॉम्ब हल्ले आणि गोळीबारात युक्रेनमधील सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
आता रशियाने पुन्हा एकदा नागरिकांसाठी चार शहरांमध्ये शस्त्रसंधी लागू केली आहे. यामध्ये राजधानी किव्ह, खारकिव्ह, सुमी आणि मारीयुपोल या शहरांचा समावेश आहे.
फ्रान्सने केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय रशियाने घेतला आहे. रशियाने शनिवारी देखील दोन शहरांसाठी शस्त्रसंधी लागू केली होती. रशियाच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे मॉस्कोतील स्थानिक वेळ सकाळी दहा वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू होणार आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध बाराव्या दिवशी देखील सुरू असून रशिया युक्रेन वर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील अनेक शहरी उद्ध्वस्त झाली असून शेकडो नागरिकांचे जीव केले आहे.
Russian military declares ceasefire in Ukraine from 0700 GMT to open humanitarian corridors at French President Emmanuel Macron's request: Sputnik
— ANI (@ANI) March 7, 2022