मालेगावात 125 कोटी रुपयांचा हवाला घोटाळा, भाजप नेत्यांचे वोट जिहादचे आरोप; दोघांची अटक
वोट जिहादच्या आरोपांनंतर मालेगावात मोठा आर्थिक घोटाळा; 125 कोटी रुपये बेहिशोबी जमा, पोलिसांनी दोघांना अटक केली
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत “वोट जिहाद” घडवला जात असल्याचा दावा केला आहे. सोमय्या यांनी मालेगाव येथील एका बँकेतून 125 कोटी रुपये बेहिशोबी पद्धतीने विविध बँक खात्यात जमा झाल्याचे सांगितले. या आरोपावरून एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणातील दोघांना अटक केली आहे.
“पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
किरिट सोमय्या यांच्या आरोपानुसार, मालेगावच्या बँकेत हवाला रॅकेटमार्फत बेहिशोबी रक्कमेची मोठी उलाढाल झाल्याचा दावा केला जात आहे. सोमय्या यांनी हा पैसा “वोट जिहाद”च्या नावावर जमा करण्यात आला असल्याचे सांगितले. एकाच महिन्यात 200 बँक खात्यांमध्ये 2500 व्यवहार झाले असून, यातून 125 कोटी रुपये जमा करण्यात आले.
पूर्व-छत्रपती संभाजीनगर!
मालेगावातील सिराज मोहम्मद आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. सोमय्या यांनी निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी आणि आरबीआयसारख्या संस्थांना तक्रार दाखल केली असून, या घोटाळ्याची सखोल तपासणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.