क्राईम बिट

औरंगाबादजवळ रेल्वेवर दरोडा ; या महिन्यातील दरोड्याची ही तिसरी घटना

Share Now

औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री दौलताबाद- पोटूळदरम्यान घडली. सिग्नलला कपडा बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा आहे. जणांच्या टोळीने लुटमार केल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लुटमार केल्याची घटनास्थळी एक रुग्णवाहिनी होती.

हेही वाचा :- राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ

दरोडेखोरच रुग्णवाहिकेने आल्याची शक्यता वर्तवली जात आहे, याच मार्गावर दोन एप्रिल रोजी अशाच प्रकारे नंदिग्राम एक्सप्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबा केल्याची घटना घडली होती.

औरंगाबाद स्टेशनवरून देवगिरी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना होताच गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ सिग्नलला कपडा बांधून रेल्वे थांबविण्यात आली. यादरम्यान आठ ते दहा दरोडेखोर रेल्वेत चढले आणि त्यांनी प्रवाशांची लुटमार सुरू केली. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. यात एका महिलेची चेन व इतर दागिने दरोडेखोरांनी हिसकावले ची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :- मंत्री धनंजय मुंडे यांना महिलेची पाच कोटींची मागणी, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करायची धमकी

रेल्वे चालकाने रेल्वे पुढे नेण्याचा प्रयत्न केला मात्र दरोडेखोरांनी चैन ओढून रेल्वे थांबवली होती, या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बळाला मिळताच अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेच्या डब्बा क्रमांक पाच आणि नऊ वर दरोडेखोरांनी तुफान
दगडफेक केल्याने प्रवासी भयभीत झाले होते. मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने प्रवाश्यानी दरवाजा व खिडक्या बंद करून घेतल्या. हा सगळा प्रकार अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ सुरू होता. लासुर ते रोटेगाव या मार्गावर पोलीस चौकी नसल्यामुळे दरोडेखोर या मार्गावर लूटमार करीत आहेत.

हेही वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA १३% वाढणार, तीन महिन्यांची थकबाकीसुद्ध

पोटूळ स्टेशनवर या महिन्यात रेल्वेवर दरोडा पडण्याची तिसरी घटना घडली. 2 एप्रिल रोजी अडीच तासांत दोन दरोडे घटना घडल्यानंतर 22 एप्रिल रोजी त्याच ठिकाणी दरोडेखोरांनी डाव टाकला.

हे ही वाचा (Read This)   या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *