तणावाचे वेळीच काही केले नाही तर डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका, पहा उपाय
आजकाल प्रत्येकाच्याच आयुष्यात काहिनाकाही टेन्शन तर आहेच कोणाला ऑफिसच्या कामाचं, कोणाला सामाजिक-कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं या दबावामुळे तणाव वाटणे स्वाभाविक आहे.पण प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी टेन्शन घेण्याची सवय, अनेकदा तुमच्या मेंटल हेल्थसाठी हानिकारक ठरू शकते. या तणावाचे वेळीच काही केले नाही तर डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका असतो. आरोग्य तज्ञ म्हणतात की, चिंता करणे स्वाभाविक आहे, पण त्या चिंतेची कारण काय आहेत ते शोधून चिंतामुक्त होण्याचा प्रयत्न करा. पण तरीही फायदा मिळाला नाहीतर psychiatrist ची मदत घ्या.
अन्नधान्याचे उत्पादन कमी होण्याच्या भीतीने भाव वाढणार, गव्हाचा साठा १४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर
आपल्या डेली रुटीन मध्येही काही सवयी चिंता वाढवू शकतात.ते कसं तर ज्या लोकांना रात्रीची झोप मिळत नाही त्याना इतरांच्या तुलनेत जास्त चिंतीत होण्याची समस्या असते. यामुळेच प्रत्येकाला दररोज 7-8 तासांची झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. पुरेशी झोप घेतल्याने शरीराला आणि मनाला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त विकारांवर मात करू शकता.
असं कर्ज जे परतफेड करण्याची गरज नाही, जाणून घ्या किती मिळेल मदत
समजा जर का तुम्हाला अस वाटत असेल की चहा कॉफी पिल्याने आपल्याला फ्रेश वाटेल टेन्शन कमी होईल तर अस अजिबात नाहीये. एक कप कॉफी किंवा चहाने तुम्ही थोडा वेळ चांगलं फील कराल पण जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्याने चिडचिड आणि मळमळ होते. त्यामुळे फ्रेश वाटायचं सोडून आणखीच खराब वाटायला लागतं.
आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा सोसल तेवढाच वापर करा कारण आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जे लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात त्यांना इतर लोकांपेक्षा चिंता आणि तणावाचे विकार होण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा सोशल मीडियावर अशा पोस्ट आढळतात ज्यामुळे तुम्हाला खूप काळजी वाटते, दुःख होते,राग येतो, त्यामुळे फेसबुक सिंड्रोम होण्याची शक्यता वाढते आणि जर फ्रेश फील करायचे असेल तर तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा एक्सरसाईज करा. कारण एक्सरसाईज केल्याने मन आणि शरीर रिलॅक्स होते आणि आरोग्य ही चांगले राहते. आणि यापुढे जर चिंता करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा चिंता आणि चिता मध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. त्यामुळे जर तुम्हाला सतत चिंता वाटत असेल तर नियमित शारीरिक व्यायामाची सवय लावा.