पावसाचे पाणी प्यायल्याने होतात अनेक आजार, संशोधनातून आले समोर
जगभरात प्रदूषण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे देशाच्या काही भागात भूजलही पिण्यायोग्य नाही . जलशक्ती मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 18 राज्यांमधील 152 जिल्हे असे आहेत जिथे भूजलामध्ये प्रति लिटर 0.03 मिलीग्रामपेक्षा जास्त युरेनियम आढळले आहे. 29 राज्यांतील 491 जिल्ह्यांतील काही भागांमध्ये भूजलातील लोहाचे प्रमाण प्रति लिटर 1 मिलीग्रामपेक्षा जास्त आहे. दरम्यान, एक नवीन संशोधन समोर आले आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की , जगातील कोणत्याही भागात पावसाचे पाणी पिण्यायोग्य नाही.
कोरोनाचा संसर्ग वाढला ! स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास निर्बंध? केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स जारी
वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत ठरले आहे. पावसाचे पाणी आता मानवाने पिण्यासाठी वापरले तर त्यांना गंभीर आजार होऊ शकतात, असे संशोधनातून दिसून आले आहे. मात्र, पावसाचे पाणी शुद्ध असते, असा सर्वसामान्यांचा समज आहे. अनेक भागात हे पाणी पिण्यासाठीही वापरले जाते. पण आता याचा विचार करायला हवा. पावसाच्या पाण्यात पीएफएएस आढळून आल्याचे संशोधनात म्हटले आहे. हे एक प्रकारचे विषारी रसायन आहे. ज्यामुळे अनेक प्रकारचे धोकादायक आजार होऊ शकतात. दूषित पाणी प्यायल्यानेही मृत्यू होऊ शकतो.
स्टॉकहोम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे
स्वीडनमधील स्टॉकहोम युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, जगात अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे पावसाचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित असेल. अंटार्क्टिका ते तिबेटपर्यंत पावसाच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की पावसाचे पाणी पिण्यासाठी निर्धारित मानकांची पूर्तता करत नाही. या पाण्यात अनेक प्रकारच्या रसायनांचे प्रमाण निर्धारित मानकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आढळून आले आहे.
पावसाचे पाणी मानवी शरीरात शिरले तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पावसाचे पाणी दूषित करणारे रसायन पृथ्वीच्या वातावरणात इतके पसरले आहे की ते कधीही संपणार नाही. म्हणजे अनेक प्रयत्न करूनही येणाऱ्या काळात प्रदूषणावर नियंत्रण मिळवता आले तरी पावसाचे पाणी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी नेहमीच दूषित आणि विषारी राहणार आहे.
हे आजार दूषित पाण्यामुळे होऊ शकतात
- हेपेटाइटिस
- डायरिया
- टायफाइड
- पेचिश
- साल्मोनेलोसिस
- शिगेलोसिस