रेशन कार्ड वर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या दिवाळीवर सावट !
रेशन कार्ड वर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या दिवाळीवर सावट !
दिवाळीची प्रतीक्षा प्रत्येकाला असते, लहानथोर, श्रीमंत गरीब ! पण यंदा गोरगरिबांना अत्यावश्यक अन्नधान्य मिळणे कठीण झालंय. दिवाळी निमित्त गरिबांना स्वस्त दरात मिळणारी साखर, दाळ, तेल, रवा, हे आवश्यक सामान यंदा या नागरिकांना मिळालं नाही. बाजारात तेलाचे भाव प्रचंड वाढले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानावर दिवाळी निमित्त गरजेचं सामान तरी बजेट मध्ये मिळेल अशी इच्छा होती. त्यामुळे दिवाळी साजरी कशी करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवाळी निमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण असलं तरीही दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या दिवाळी चं काय?
राज्यातील 8.50 कोटी लोक रेशन वर मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर अवलंबून आहे. राशनकार्ड वर मिळणाऱ्या सामनातून थोडी फार तरी त्यांची दिवाळी चांगली होत होती. परंतु आता गरिबांच्या चेहेऱ्यावरचा आनंद का हिसकावण्यात येतोय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
त्याचबरोबर काही ठिकाणी तर बेसन मैदा घेण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. आणि जर हे सामान घेतले नाही तर गहू तांदूळ डबल किंमतीने दिले जात आहे.
आज दिवाळी चा दुसरा दिवस असून यंदा ची दिवाळी या नागरिकांसाठी कोरडीच होत असल्याचे दिसत आहे.
राज्यात 1 कोटी 62 हजार 25 हजार 830 रेशन कार्डधारक कुटुंब आहेत. 8 कोटी 50 लाख नागरिक रेशनवर अवलंबून आहे. 52 हजार 550 ही एकूण रेशन दुकानांची संख्या असून सुरु असलेली दुकाने, 18,443 आणि 1 कोटी 7 लाख 91 हजार 332 नागरिकांकडे गरीब कल्याण अन्न योजना कार्ड उपलब्ध आहे.