राज्यातील या शहरात नवीन वर्षात मिळणार 5G सेवा

माहिती आणि तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत होताना दिसत आहे, मागील चार वर्षात झालेली डिजिटल क्रांती म्हणयाल हरकत नाही. काही अपवाद वगळता आता बरेच जण आज नेटवर्कच्या जोडले गेले आहेत. दैनंदिन जीवनातील बहुतांश व्यवहार देखील आता ऑनलाइन झाले आहे. हे आपण अनुभवतो आहे.

भारतात सद्या 4 G नेटवर्क सुविधा आहे, मात्र 5 G नेटवर्क देखील लवकरच येणार अशी चर्चा आपण दोन वर्षांपासून ऐकत होतो. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम लागणार आहे. येत्या नवीन वर्षात 5 G नेटवर्कची सेवा मिळणार आहे.

भारतात, 4G नेटवर्कमुळे प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक वेगवेगळे बदल पाहिले आहेत. पण 4G नंतर आता लोक 5G ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 5G (5G नेटवर्क) च्या प्रवेशाने खरी डिजिटल क्रांती अपेक्षित आहे.

महानगर आणि गुरुग्राम, बंगळुरु , कोलकाता, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे ही प्रमुख शहरे पुढील वर्षी 5G सेवा मिळवणारी पहिली राज्ये असतील, असे दूरसंचार विभागाने (DoT) सोमवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. मार्च-एप्रिल 2022 मध्ये 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याची सरकारची योजना आहे.
येणाऱ्या नवीन वर्षात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरात 5G सुविधा मिळणार आहे.

5g नेटवर्क येण्याआधीच बऱ्याच मोबाईल कंपन्यांनी 5 G स्मार्ट फ़ोन काढले आहे, 5 G येणार असल्याच्या कारणाने बऱ्याच कंपन्यांनी 4 G नेटवर्क फोन लॉन्च करणे बंद केले आहेत.

5G नेटवर्क म्हणजे काय .?
mmWave ला उच्च बँड 5G नेटवर्क वारंवारता म्हणतात. या बँडमध्ये 24GHz पेक्षा जास्त वारंवार वापरली जाते आणि त्याहूनही अधिक बँडविड्थ येथे उपलब्ध आहे. जर आपण डेटाच्या गतीबद्दल बोललो तर येथे ते 1Gb प्रति सेकंद आहे. ते उपयोजित करण्यासाठी, अनेक लहान आणि खालच्या श्रेणीतील सेल फोन टॉवर्स वापरले जातात जेणेकरून कव्हरेज पूर्ण करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *