महाराष्ट्र

राज्यातील शाळा आणि कॉलेज ऑनलाईन की ऑफलाईन आज निर्णय..?

Share Now

राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या बघता तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येऊ शकणार नाही. गेल्याकाही दिवसांपूर्वी शाळा , कॉलेज सुरळीतपणे सुरू झाले होते परंतु आता वाढती रुग्ण संख्या बघता शाळा आणि कॉलेज पुन्हा ऑनलाइन होणार का असा प्रश्न विद्यार्थी तसेच पालकांना पडला आहे.

यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिक्षण विभागाचे अधिकारी , जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त आणि कुलगुरू यांची बैठक घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

उदय सामंत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन महाविद्यालयातील शिक्षण ऑफलाईन की ऑनलाईन यासंदर्भातील निर्णय जाहीर करतील. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या वसतिगृहांवर देखील निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.

या बैठकीनंतर आज चार वाजता निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *