देशात रामराज्य येणार आहे याबद्दल मी देवाकडे प्रार्थना केली – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
अयोध्येत मंदिराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे लवकरच भव्य दिव्य राम मंदिर उभारले जाईल यासोबतच देशात रामराज्य येणार आहे याबद्दल मी देवाकडे प्रार्थना केली, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले.
भगतसिंग कोश्यारी दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत,
रामनवमीच्या निमित्ताने यांनी नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थितीत होते.
रामाचे चरित्र तुम्ही जितके वाचाल तितके तुमचे आयुष्य सुखद होईल, या ठिकाणी मी प्रत्येक वेळेस येऊ शकणार नाही पण आपण तरी इथे दररोज दर्शन घ्या. श्रीलंका जिंकून त्यांना परत केली, किती मोठी गोष्ट. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. श्रीरामाचे चारित्र्य जेवढे अभ्यासू, तेवढी आयुष्यात प्रगती होईल. श्रीलंकेला जिंकल्यानंतर रामाने देश परत केला होता. रामांचा हा मोठेपणा आहे. ते मर्यादा पुरषोत्तम आहे.
हे ही वाचा :- मनसेनं शिवसेना भवनासमोरच हनुमान चालिसा पठण केलं..
तसेच, महात्मा गांधी सुद्धा ‘रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीता राम’ म्हणत होते. त्यामुळे तुम्ही आयुष्यात रामाचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. मग आपण सामन्य कार्यकर्ते असो, सामन्य व्यक्ती असो किंवा राजकीय व्यक्ती असो सर्वांनी रामाचे आदर्श ठेवले पाहिजे’ असं आवाहनही राज्यपालांनी केलं.