पहाटे 3 वाजता लागला राज्यसभेचा निकाल, कोण विजयी कोण पराभूत
काल (10 जून) राज्यसभेची निवडणूक झाली. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये लढत रंगताना पाहायला मिळत मिळाली. प्रत्येक मत दोनी पक्षांसाठी महत्वाचे होते. तसेच भाजपने मतमोजणी होण्या पूर्वी निवडणूक आयोगाला भाजपने आक्षेप घेत, मतमोजणी थांबवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील पत्र पाठवले. तसेच मतपत्रिका महाविकास आघाडीतील आमदारांनी दुसर्यांना दाखवत निवडणूक नियमांचा भंग केला असा आरोप भाजपने केला होता. यावरून आयोगाने सुहास कांदे यांचे मत बाद केले, निवणूक होऊन काही आठ तास झालय नंतर रात्री 2 वाजता मतमोजणी सुरु झाली आणि पहाटे 3 वाजता त्याचा निकाल आला असून महाविकास आघाडीचे ३ तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे संजय पवार पराभुत झाला आहे.
हेही वाचा
- आज झालेली राज्यसभा निवडणूक रद्द ? , भाजपचा निवडणुकीवर अक्षेप
- मिरचीचे सुधारित वाण: मिरचीच्या या शीर्ष ५ जाती अधिक उत्पादन देतील
शिवसेनेचे संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल तसेच कॉग्रेसचे इम्रान प्रतापगडी असे महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार आहे तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धनंजय महाडिक, अनिल बोंडे असे भाजपचे विजयी उमेदवार आहे.
किती मते कोणाला पडली…
- संजय राऊत- 41
- प्रफुल्ल पटेल- 43 -2
- ईम्रान प्रतापगडी- 44 – 3
- संजय पवार- 33
- अनिल बोंडे- 48
- पियुष गोयल- 48
- धनंजय महाडिक 27
संजय पवारांचा पराभव कसा झाला ?
संजय पवार यांना 33 मते मिळाली त्यात प्रफुल्ल पटेल यांना मिळालेली 43 मते त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत उरलेली 2 तर प्रतापगडी यांना मिळालेली 44 मते त्यातील 41 चा कोटा पाहता 3 मत शिल्लक राहतात. त्यामुळे संजय पवार यांना 38 मते मिळाली.
धनंजय महाडिक यांचा विजय कसा झाला ?
धनंजय महाडिक यांना 27 तर पियुष गोयल यांना 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते. तर अनिल बोंडे यांना ही 48 मते मिळाली त्यातील 41 चा कोटा पूर्ण करत 7 अधिक मते मिळाली. 27 अधिक पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची 14 मते अशी धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली यामध्ये महाडिक यांचा विजय झाला आहे.