राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली मिनी लॉकडाऊन बाबत निर्णय ?
वाढणारी कोरोनाची रुग्ण संख्या यावर आज मंत्रिमंडळात बैठक पार पडली, या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून होते. राज्यात लॉकडाऊन लागणार या चर्चेला देखील उधाण आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारची बैठक संपली आहे. सध्या तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही. मात्र निर्बंध आणखी कडक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा नव्या निर्बंधाची नियमावली जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. टास्क फोर्स सोबत राज्यातील कोरोनाचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.
काल १८ हजाराहून अधिक कोरोना रुग्णामध्ये भर पडली आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉक डाऊन लावण्यात येणार नाही पण निर्बंध मात्र कडक करावे लागतील. असं त्यांनी सांगितलं होतं.
Maharashtra Govt's meeting chaired by Deputy CM Ajit Pawar on prevailing COVID situation concludes; no decision on imposing lockdown yet https://t.co/Chnz59ldKN
— ANI (@ANI) January 5, 2022