राजकारण

राजू शेट्टीची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतुन बाहेर पडणार.?

Share Now

माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात ५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक होणार असून या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत जाऊ शकते अशी चर्चा आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी राजू शेट्टी यांनी १४ दिवस कोल्हापूरला धरणे आंदोलन केले. महा विकास आघाडी सरकारच्या अनेक धोरणांच्या विरोधात त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. यामुळे भविष्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता दाट आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *