आरोग्य विभागाच्या परीक्षा लवकरच राजेश टोपे यांची माहिती
आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया पेपर फुटल्याची घटना दुर्दैवी आहे. पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात यावी असे आरोग्य विभाग आणि मंत्रिमंडळाची मत आहे. पेपर पुढच्या चा प्राथमिक अहवाल गृहमंत्रालयाकडून आलय. स्वामी सर अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आठ दिवसात अहवाल प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे त्यानंतर मोठ्या कंपनीच्या सहकार्याने परीक्षा घेण्यात येईल.
क आणि ड प्रवर्गातील पदे भरण्यासाठी यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली होती. साधारण ४ हजार पदे पहिल्या टप्प्यात भरण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. पेपर फुटल्याने पुन्हा नव्याने परीक्षा घ्यावी यावर आरोग्य विभाग आणि मंत्रिमंडळाची एकमत झाले, असून पेपरफुटीचा प्राथमिक अहवाल गृहमंत्र्यांनी दिला परंतु तो स्पष्ट नाही. त्यामुळे अंतिम अहवालाची मागणी करत आहोत. पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्त याना देखील सूचना केल्या आहेत.
एकाच बाकावर दोन विद्यार्थी दोघांच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असतील अशा पद्धतीने नीट सारख्या परीक्षांमध्ये असते. एमकेसीएल तसेच टाटा कन्सल्टंट या कंपन्यांच्या सहकार्याने परीक्षा शक्य आहे. लवकरच भरती होईल त्यासोबतच परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, गरज पडली तर शासन परीक्षा शुल्क भरले अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.