एकनाथ शिंदेंकडून राजेंद्र जंजाळ यांची जिल्हाप्रमुख पदी निवड
आदित्य ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याला शह देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रयत्न असू शकतो?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र जंजाळ यांची औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबादच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्रकांत खैरे व राजेंद्र जंजाळ यांच्या टोकाचे वाद आहेत. पक्षात बंडखोरी नसताना देखील या दोन्ही नेत्यांचे वाद सर्वश्रुत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राजेंद्र जंजाळ यांची जिल्हाप्रमुख पदी निवड #Eknath_Shinde #mlasanjayshirsath #rajendrajanjal pic.twitter.com/tPKomoVaYx
— The Reporter (@TheReporterind) July 23, 2022
हेही वाचा :
अग्निपथ योजना। नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती
दरम्यान, गेल्या आठवड्यात जंजाळ यांची युवासेनेतून पक्ष विरोधी कारवाई केल्याने हकालपट्टी करण्यात आली होती. आदित्य ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याला शह देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.