महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ‘किआन’ ..! काय आहे या नावाचा अर्थ ?

Share Now

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली यांना नुकतंच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. या चिमुकल्याचं नावं ‘किआन’ असं ठेवण्यात आलं आहे. नुकताच या चिमुकल्याचा आज राज ठाकरे यांच्या घरी नामकरण सोहळा पार पडला आहे.

या सोहळ्यासाठी केवळ घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं. ५ एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं होत. नव्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली होती.

हेही वाचा :- राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध झालेला नाही ; मुंबई सत्र न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं

राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांच्या पुत्राचं नाव ‘किआन’ असं ठेवण्यात आलं आहे. ‘किआन’ हे हिंदू धर्मातील नाव आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा, प्राचीन , राजेशाही असा आहे. याची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असणार यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक चर्चा आणि पोस्टही व्हायरल झाल्या होत्या त्यानंतर आता अखेरीस अमित ठाकरेंच्या पुत्राचा नामकरण सोहळा पार पडला आहे.

आता यापुढे राज ठाकरे आपल्या नातवासोबत वेळ घालवताना आणि किआन त्यांच्या अंगाखांद्यावर खेळताना दिसेल. चिमुकल्याचा आगमनापासूनच राज ठाकरे यांच्या घरी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. चिमुकल्याच्या आगमनानंतर बाळाचे आजोबा राज ठाकरे आणि त्याच्या पत्नी म्हणजे बाळाच्या आजी शर्मिला यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की, ‘आजी-आजोबा होण्यासारखं दुसरं कोणतंही सुख नाही.’

अमित ठाकरे आणि मिताली यांचे २७ जानेवारी २०१९ रोजी लग्न झाले होते. त्या दरम्यानच अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते. या लग्नसोहळ्यात प्रतिष्ठित नेते, ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती.

हे ही वाचा (Read This) सरकारी नोकरी: महाराष्ट्र विद्युत विभागात भरती, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *