रेल्वेने आज ट्रेन 149 केल्या रद्द, यात तुमची ट्रेन आहे की नाही? जाणून घ्या
जर तुम्ही आज भारतीय रेल्वेने प्रवास करणार असाल तर आधी तुमची ट्रेन आज रद्द झाली नाही ना ते तपासा. IRCTC च्या वेबसाइटनुसार, आज 9 जुलै रोजी रेल्वेने 149 गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पॅसेंजर, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. आपण संपूर्ण यादी देखील तपासू शकता.
साखर निर्यातीसाठी सरकारने 20 जुलैपर्यंत दिली सूट
इतक्या गाड्यांचा मार्ग बदला
भारतीय रेल्वेने 11 गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे आणि 23 गाड्या वळवल्या आहेत. खराब हवामान, पाऊस आणि देखभालीमुळे रेल्वेने या गाड्या रद्द केल्या आहेत. पुनर्निर्धारित गाड्यांमध्ये 12420, 12724, 14211, 18109, 18176, 22512, 01813, 04133, 06652, 11080 क्रमांकाच्या गाड्यांचा समावेश आहे.
या गाड्या या राज्यांत जातात
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे 16 ठार, 50 जखमी, पंतप्रधान मोदींनी घेतला परिस्थितीचा आढावा
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि बिहारसाठी जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. रद्द केलेल्या गाड्यांची संख्या IRCTC च्या वेबसाइटवर पाहता येईल.
येथे तपासा
IRCTC वेबसाइटवर पूर्ण आणि अंशतः रद्द केलेल्या गाड्यांची यादी पोस्ट केली आहे. त्यांनी प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी https://enquiry.indianrail.gov.in/mntes किंवा NTES अॅपला भेट देऊन ट्रेन तपशील तपासण्यास सांगितले आहे. रद्द केलेल्या गाड्यांची यादी पाहण्यासाठी https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 या लिंकवर क्लिक करून तुम्हाला माहिती मिळेल.