क्राईम बिटराजकारण

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांच्या घरावर धाड

Share Now

गेल्या काही दिवसापासून मुंबईत आयकर विभागाची छापे मारी सुरू आहे. मुंबई मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती. आज युवा सेनेच्या राहुल कनाल या नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे.

राहुल कनाल हे उद्योजक असून. युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या शिवाय शिर्डी देवस्थान समितीवर ते पदाधिकारीही आहेत. कनाल मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. ते शिक्षण समितीवरही होते. अनेक जण कनाल यांचे इम्तियाज खत्रीशी कनेक्शन असल्याचे सांगतात. तर काहीजण कनाल हे आदित्य ठाकरेंसाठी पार्ट्यांचे आयोजन करतात, अशी देखील चर्चा आहे .

आयकर विभागाच्या पथकाने आज सकाळी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की नाही, याची माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्र किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या छाप्यानंतर पुन्हा ते चर्चेत आलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *