महाराष्ट्रराजकारण

अधिवेशनात ‘राडा’, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधकात धक्का बुक्की

Share Now

Breaking News

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं असून. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले होते. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे.

बातमी अपडेट होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *