पुण्यातील शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद
राज्यातील वाढणारी कोरोनाची रुग्ण संख्या चिंता वाढवणारी आहे, आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आणि अन्य नेते, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली यात वाढत्या रुग्ण संख्ये आटोक्यात यावी यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहे.
आज झालेल्या बैठकीत पुण्यातील पहिली ते आठवी पर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३१ जानेवारी पर्यंत शाळा बंद राहणार आहेत. पुणे जिल्ह्यातील वाढणारी रुग्णसंख्येचा पॉझिटिव्ह रेट १८ टक्क्यांवर असून आज शहरात ११०४ नवे रुग्ण सापडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदे घेऊन याबाबतीत माहिती दिली.